BMC Commissioner News Sarkarnama
मुंबई

BMC आयुक्तपदासाठी चर्चेत असलेल्या IAS मनिषा म्हैसकरांची बदली; मिलिंद म्हैसकरांकडे बांधकाम विभागाची अतिरिक्त जबाबदारी

मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार? तसंच पालिकेचे आयुक्त कोण होणार? याकडंही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Amit Ujagare

BMC Commissioner : मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार? तसंच पालिकेचे आयुक्त कोण होणार? याकडंही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यासाठी IAS अधिकारी असलेल्या मनिषा म्हैसकर आणि त्यांचे पती IAS मिलिंद म्हैसकर या दाम्पत्यापैकी एकाच्या नावाची यापदासाठी चर्चा सुरु होती. पण या दोघांचीही नाव या चर्चेतून बाद झाली असून मनिषा म्हैसकर यांची दुसऱ्याच विभागात बदली करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदी मनिषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले IAS अधिकारी डॉ. आय. एस. चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळं ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळं आता मनिषा म्हैसकर या ३१ जानेवारी २०२६ रोजी डॉ. चलह यांच्याकडून गृह विभागाच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारतील. तसंच सध्या त्या कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार त्यांचे पती IAS मिलिंद म्हैसकर यांच्याकडं सोपवतील. मिलिंद म्हैसकर यांच्याकडं हा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. कारण सध्या ते महाराष्ट्र सरकारचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी (फॉरेस्ट), रेवेन्यू एंड फॉरेंस्टची जबाबदारी सांभाळत आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नसल्यानं आता मनिषा म्हैसकरांचं नाव मागे पडून मिलिंग म्हैसकर यांची याठिकाणी वर्णी लागू शकते किंवा इतर IAS अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केली जाऊ शकते. पण अद्यापही याची घोषणा न झाल्यानं मुंबईचा महापौर कोण होणार? याची जशी समस्त मुंबईकरांना उत्सुकता आहे तशीच मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त कोण होणार? याकडंही त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबईच्या आयुक्त अन् प्रशासकपदी सध्या IAS अधिकारी भूषण गगरानी हे काम पाहत आहेत. पण दोन महिन्यांनंतर गगरानी हे सेवानिवृत्त होणार असल्यानं आयुक्तपदाची जागा रिक्त होणार आहे. 1990 च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले भूषण गगरानी हे मार्च 2024 पासून मुंबईचे आयुक्त आहेत. सध्या महापालिकेवर प्रशासक म्हणून भूषण गगरानी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, ते मार्च 2026 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT