Ajit Pawar: दादांचा सच्चा कार्यकर्ता! अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून...; आता निधनानंतर केलं मुंडन

Ajit Pawar: अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या एका सच्च्या कार्यकर्त्यानं व्रत केलं होतं, पण आता त्याचं हे व्रत कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून त्यानं जड अंतकरणानं मुंडन केलं.
Vilas Zodpe
Vilas Zodpe
Published on
Updated on

Ajit Pawar: दिवंगत अजित पवार यांनी आजवर ६ वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. पण त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अधुरंच राहील. त्यांच्या एका सच्च्या कार्यकर्त्यानं तर अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एक संकल्पही केला होता. पण दादांच्या अचानक जाण्यामुळं आता हे सर्वच अधुरं राहिल्यानं या कार्यकर्त्यानं आपलं मुंडन करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

Vilas Zodpe
Om Raje Nimabalkar: अजितदादांच्या निधनामुळं झेडपीच्या प्रचाराबाबत ओम राजेनिंबाळकर यांचा मोठा निर्णय; म्हणाले, भान व जाण ठेवा...

कोण आहे कार्यकर्ता?

नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे रहिवासी असलेले विलास झोडपे यांना अजित पवारांचे कट्टर समर्थक मानलं जातं. झोडपे हे अजितदादांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी एक संकल्प केला होता. 'जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आपण डोक्यावरचे केस कापणार नाही' अशी शपथच त्यांनी घेतली होती. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जेव्हा अजितदादांना याची माहिती झाली तेव्हा या विलास झोडपे यांची भेट घेऊन त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, "विलास तू केस वाढवल्यानं मी मुख्यमंत्री होणार नाही. लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची गरज असते, तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार व्हायला पाहिजे. केस वाढवल्यानं तू पुरुष आहेस की स्त्री हे कळणार नाही, वरुन तेलाचा खर्चही वाढेल. यापेक्षा हे चांगलं राहिल की तू लोकांचं काम कर आणि संघटना आणखी मजबूत कर"

Vilas Zodpe
Ajit Srushti: अजितदादांच्या आठवणी जपणारी ‘अजित सृष्टी’ पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार; महेश लांडगेंची घोषणा

अत्यंदर्शन अन् मुंडन

अजितदादांची भेट घेण्यासाठी विलास झोडपे हे २८ जानेवारीला सकाळीच मुंबईला पोहोचले होते. पण काही वेळातच अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. यानंतर विलास झोडपे हे थेट मुंबईहून बारामतीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि दोन मुलांना देखील बारामतीला बोलावून घेतलं आणि संपूर्ण कुटुंबासह अजितदादांच्या अत्यंविधीत सहभागी झाले. पण आता अजितदादाच राहिले नाहीत त्यामुळं ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून वाढवलेले केस विलास झोडपे यांनी त्यांनाच अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बारामतीच्या नीरा नदीतच्या संगमावरच विलास झोडपे यांनी मुंडन केलं आणि दादांना अनोख्या स्वरुपाची श्रद्धांजली वाहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com