Manisha Mhaiskar, Milind Mhaiskar, Rajgopal Deora sarkarnama
मुंबई

IAS Promotion : शिंदे-फडणवीस सरकारनं सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय..

Shinde Government News : १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकारने सहा सनदी अधिकाऱ्यांना मोठ गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे.

यात मनिषा पाटणकर-म्हैसकर, मिलिंद म्हैसकर (Milind Mhaiskar), राजगोपाल देवरा (Rajgopal Deora), बिपीन श्रीमाली, सीमा व्यास याचा समावेश आहे. मिलिंद म्हैसकर यांनी विविध पदावर काम केले आहे. ते म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ होते, तर, मनीषा म्हैसकर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

कोण आहेत मनीषा आणि मिलिंद म्हैसकर

सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर (५०) मनीषा म्हैसकर (४९) या दोघांचीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९९२ मध्ये सोबतच आयएएसपदी निवड झाली होती. मसुरीला प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. डिसेंबर १९९४ मध्ये दोघांनी लग्न केले.

तर दुसरीकडे जळगाव महापालिका आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काल सरकारच्या नगरविकास विभागातर्फे काढण्यात आले. काल सांयकाळी सात वाजता त्यांनी महापालिकेत येवून पुन्हा आपल्या पदाचा पदभार स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बदली करण्यात आली होती. त्या बदलीला त्यांनी ‘मॅट’(महाराष्ट्र ॲडमिनीस्टेटीव्ह ट्रीब्युनल) मध्ये अवाहन दिले होते.

त्यावर तब्बल दोन महिन्यांनी फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला होता. यात ‘मॅट’ने त्यांचा बदली आदेश रद्द करून त्यांची पुन्हा आयुक्तपदी नियुक्ती करावी असा आदेश दिला होता. मात्र सद्याचे आयुक्त देविदास पवार व राज्य शासन यांना या निकालाविरूध्द अपीलात जाण्याची एक आठवड्याची मुदत दिली होती. मात्र या कालावधीत शासनाने अपीलात न जाता नियुक्तीचा आदेश काढल्यास डॅा.गायकवाड या पदाचा पदभार घेतील असेही आदेशात नमूद केले होते.

शासनाच्या नगरविकास विभागाने आज त्यांच्या नियुक्तीचा अध्यादेश जारी केला. उपसचिव प्रियांका कुळकर्णी - छापवाले यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. यात म्हटले आहे.कि मुख्याधिकारी ‘अ’गट श्रेणीच्य संवर्गातील देविदास पवार यांची संदर्भ एक मधील आयुक्त जळगाव महापालिका पदावर नियुक्ती करून श्रीमती विद्या गायकवाड यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT