Chinchwad By-Election : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने लढायचं ठरवलंच, तर दहामधून एकाला उमेदवारी देण्यात अजित पवारांची कसोटी लागणार

Ajit Pawar News : बारामती होस्टेलवरील बैठकीत चिंचवड लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्णय झाला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

NCP News: सुरवातीला बिनविरोधची चर्चा असलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढायचीच नाही, तर ती जिंकायची सुद्धा हे राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता.२) ठरवले.घड्याळावरच आणि पक्षातलाच उमेदवार देण्याचेही यावेळी निश्चीत झाले. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या काहींच्या खेळींना लगाम बसला आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीत इच्छूकांची मोठी गर्दी दिसून आली आहे. तब्बल दहा इच्छूकांनी त्यासाठी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे गुरुवारी मुलाखती दिल्या. हे सगळे तालेवार असून त्यात बहूतांश माजी नगरसेवक आणि माजी पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी आहे. त्यातील एकाची निवड करण्यात अजितदादांची कसोटी लागणार आहे.

Ajit Pawar
Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते,इच्छूक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या काल पुण्यातील बारामती होस्टेलवरील बैठकीत चिंचवड लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्णय झाला.

प्रथम अजित पवारांनी उद्योगनगरीतील पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे,भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील,माजी महापौर मंगला कदम आणि चिंचवडचे प्रभारी आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी चर्चा केली. इच्छूकांची मते `वन टू वन` जाणून घेतली. नंतर इच्छूक आणि ज्येष्ठांची एकत्रित बैठक घेत दोघांचााही कानोसा घेतला.

Ajit Pawar
Sanjay Raut : राऊतांच्या खासदारकीसाठी मी पैसा खर्च केला..' असं म्हणणं राणेंना भोवणार ; राऊतांनी राणेंना...

कालच्या बैठकीचा तपशील ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहेत. त्यानंतर आजच्या महाविकास आघाडीत आज जागावाटप होऊन त्यात चिंचवड,राष्ट्रवादी,तर कसबा कॉंग्रेसच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर तेथील उमेदवार जाहीर होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com