Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर अडचण होईल : शेलारांचा गंभीर इशारा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की "भाजपासोबत सरकार नको, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातलीच होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना मिळून सरकार स्थापन करावं, असा प्रस्ताव शिवसेनेचे वरीष्ठ नेते घेऊन आले होते. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता," असे चव्हाण म्हणाले. यावर शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर शेलारांनी थेट इशाराच दिला आहे. "अशोक चव्हाणांची क्लिप आम्ही जाहीर केली, तर त्यांची फार अडचण होईल. ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही. काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात. त्या प्रथा, परंपरांचा आम्ही भंग करू इच्छित नाही. चव्हाणांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणार नाही. मात्र त्यांच्या राजकीय बाबींवर आम्ही बोलू शकतो” अशा शब्दात शेलारांनी चव्हाण यांना इशारा दिला आहे.

यावेळी शेलार म्हणाले, मोदींनी स्वतःचा वाढदिवस जनतेची सेवा यासाठी समर्पित केला आहे. या निमित्ताने मेडिकल कॅम्प, डोनेशन कॅम्प असे उपक्रम आम्ही राबवले. मुंबईची शान असलेल्या विविध पुतळ्यांची साफ सफाई करण्याचे काम हाती घ्यायचे, असे आम्ही ठरवले. मुंबईतील 100 पुतळे आम्ही स्वच्छ करत आहोत.

यावेळी सामना वर्तमानपत्रानर टिका करताना शेलार म्हणाले, पेंग्विन सेनेची उंची आणि उडी किती त्यानुसार लिहिलं तर बरं ते ठरेल. तसेचआम्ही अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणारे मुख्यमंत्री पाहिले आहेत, असे शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT