Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात आता मोठ्या घडमोडी घडून येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवल्यास भारतीय जनता पक्षाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे, असे वृत्त साम टीव्ही या वृत्तवाहिनीने दिले आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून हा भाजप पुढचा पहिला पर्याय असेल, असे सांगितले जात आहे.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा सर्वात जवळचा पर्याय भाजपपुढे आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास आता राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.
आमदार अपात्रतेवरून राज्यात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेताना विनाकारण विलंब करत आहेत. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानुसार न्यायालयाने अध्यक्षांवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्यात अध्यक्षांनी सुनावणी घेत यावर कार्यवाहीला सुरुवात करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार आता अध्यक्षांनी निर्णय घेतल्यास भाजपने आपली रणनीती तयार ठेवली आहे.
Edited By - Chetan Zadpe
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.