Rahul Narwekar At Lalbaug Raja: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर लालबागच्या गणपती दर्शनाला; राजाला काय घातलं साकडं?

Rahul Narwekar Meet Lalbaug Ganpati : राहुल नार्वेकर यांनीसुद्धा लालबाग गणपती मंडळाला भेट देत...
Rahul Narwekar At Lalbaug Raja :
Rahul Narwekar At Lalbaug Raja : sarkarnama

Mumbai News : आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आहे. घरोघरी गणपतीचे आगमन होणार आहे. सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. विविध राजकीय नेते मंडळांना भेटी देत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीसुद्धा लालबाग गणपती मंडळाला भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले. (Latest Marathi News)

Rahul Narwekar At Lalbaug Raja :
Supreme Court MLA Disqualification: सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार ?

राज्यभरात एकूणच गणरायाच्या आगमनाचा उत्साह असताना, या उत्साहामध्ये राहुल नार्वेकर सुद्धा सहभागी झाले. अनेक गणेश भक्तांसारखे राहुल नार्वेकरही सहभागी झाले. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) दाखल झाले आहेत.

लालबागचे ९० वे वर्ष

लालबागच्या राजा गणपतीचं यंदाचे हे 90 वे साल आहे. लालबागच्या राजाची देशभरात विशेष ख्याती आहे. लालबागला दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात. लालबागला राजा मंडळाने यंदा रायगडाची प्रतिकृती हा देखावा साकारला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com