Sharad Pawar  
मुंबई

जर तो मुस्लीम कार्यकर्ता असेल तर त्याला दाऊदचा माणूस म्हटले जाते- शरद पवार

Sharad Pawar नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून जे जाहीरपणे बोलत होते ते पाहता त्यांनाही असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील कारवाई म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, हे त्यांचच उदाहरण आहे.सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून जे जाहीरपणे बोलत होते ते पाहता त्यांनाही असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करायची गरज नाही. पण पुरावे कशाचे? कसली केस काढली इडीने? एक साधी गोष्ट आहे, काही झालं की विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याला दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. (

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आज सकाळी ईडीने (ED)कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे. मलिक सध्या ईडीच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडतात त्यामुळे अशा प्रकारे तपास यंत्रणांचा गैरवापर करुन नवाब मलिकांवर कारवाई केली जात आहे. त्यातच जर तो मुस्लिम कार्यकर्ता असेल, तर त्याचा संबंध थेट दाऊदशीच जोडला जातो. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम राज्यात सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

25 वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले गेले. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप केला होता. त्यावेळीही असंच वातावरण तयार केलं गेलं. पण कोण काय, कुठं काय कसलीही माहिती दिली गेली नाही. देशात जे सुरु आहे त्यात नवीन काही नाही. केंद्र सरकारच्या विरोधात किंवा एजन्सीच्या विरोधात जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातो, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी ईडी आणि इतर तपास यंत्रणा ही कारवाई करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मलिक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज पहाटेच पाच वाजताच मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चाही झाली. त्यानंतर नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगत ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT