Kapail Patil Attacks on Congress : भारत तुटलेला नसताना 'भारत जोडो' (Bharat jodo yatra) आणि आता 'हात जोडो' कशासाठी, हे काय मला कळलेले नाही. कशाचा हात कोठे जोडायचा, याचे उत्तर तेच देऊ शकतात, मी काय उत्तर देणार, असा टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी मारत कॉंग्रेसच्या 'हात से हात जोडो' (hat se hat jodo) अभियानाची खिल्ली उडवली.
कल्याण येथे एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारत जोडो' अभियानअंतर्गत पूर्ण भारत पिंजून काढला. आता 'हात से हात जोडो' या अभियानांतर्गत कॉंग्रेस तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न केले. त्यावर त्यांनी मिश्किल भाष्य करीत काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडविली.
कॉंग्रेसच्या नव्या अभियानाबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले, "मी नेहमीच काही ना काही वेगळे ऐकत असतो. भारत तुटलेला नसताना भारत जोडो (Bharat jodo yatra) कशासाठी? आता हात जोडो हे नविनच! यांना कशाचा हात कोठे जोडायचा आहे, याचे तेच उत्तर देतील."
...अन् रस्ते सुनसान व्हायचे
सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या (Swami Prasad Maurya) यांनी रामचरित मानस तुळशीदासचे रामायण बॅन करा, असे वादग्रस्त विधान केले होते. यावर पाटील म्हणाले, "त्यांच्या या विधानाला त्यांच्या पक्षाने देखील पाठिंबा दिलेला नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
वास्तविक रामचरित मानस भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात भिनलेले आहे. रामायण (Ramayan) टीव्हीवर लागताच रस्ते सुनसान व्हायचे. पाच हजार वर्षांपूर्वीची पुराणातली देवाची परंपरा त्याद्वारे उभी केली आहे. आमच्या ह्रदयात राम बसलेले आहेत. त्यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे."
निर्णय नसताना घोषणा कशाला?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना-वंचितच्या आघाडीचा चार चाकाची वेगवान गाडी असा उल्लेख केला होता. याबाबत पाटील म्हणाले, "वंचितच्या नेत्यांनी अद्याप आपले कॉंगेस आघाडीबरोबर बोलणे व्हायचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेची वंचित (Vanchit) आघाडीबरोबर युती म्हणजे अजूनही दोनच चाके आहेत. ती तीन सुद्धा झालेली नाहीत. आघाडीचा याबाबतचा निर्णय झालेला नसताना घोषणा कशाला करायची?"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.