Pathaan Release: पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक; घोषणाबाजी करत चित्रपटाचे बॅनर फाडले

Bajrang Dal protests against Pathaan : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
Pathaan
Pathaan Sarkarnama

Pune News : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहुल चित्रपटगृहाच्या आवारातील 'पठाण' चित्रपटाचे बॅनर फाडून अभिनेता शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) विरोधात घोषणाबाजी केली.

याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अंकुश कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार राहुल चित्रपटगृहात रविवारी सायंकाळी घडला आहे.

Pathaan
Cabinet expansion News : फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शिरसाट, कडू अ्न गोगावलेंच्या आशा पल्लवित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव नितीन महाजन यांच्यासह १५ ते १९ कार्यकर्ते शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाच्या आवारात आले. 'पठाण' चित्रपटात अभिनेत्रीने भगवी वस्त्रे घालून अश्लील नृत्य केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

Pathaan
Mass Suicide in Daund : 'त्या' सात जणांच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

दरम्यान, 'पठाण' चित्रपटाचे पोस्टर राहुल चित्रपटगृहात लावले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करीत घोषणाबाजी केली. तसेच राहुल चित्रपटगृहाच्या आवारात शिरुन तेथील 'पठाण' चित्रपटाचे बॅनर फाडून फाडले. यानंतर पोलिसांनी या घोषणाबाजी करणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com