Eknath Shinde | मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. पण अद्याप त्यांच्या राजीनाम्याला मंजूरी मिळालेली नाही. राजकीय दबावामुळे महापालिकेकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. असे असताना आता ऋतुजा लटके प्रकरणी शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून चाचपणी सुरु झाली आहे.
ऋतुजा लटके यांनी राजीनामा देऊन ही महापालिकेने राजीनामा स्वीकारला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज भरू शकणार नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तर ठाकरे गटाला दुसरा उमेदवार मिळाला तर भाजपला ही निवडणूक सोपी जाऊ शकते, असाही शिंदे फडणवीस यांचा प्लॅन असल्याची? अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
ऋतुजा लटके मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के/पूर्व कार्यालयात कर्मचारी होत्या. त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पण लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नसल्यामुळे इथेही उद्धव ठाकरे यांची कोंडी केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
महापालिका नियमावली 1989 नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते. राजीनामा द्यायचा असल्यास एक महिना आधी नोटीस द्यावी लागते. राजीनामा देताना एक महिना नोटीस दिली नाही तर एक महिन्याचा पगार जमा करायचा असतो. तसा ६७ हजार असा एक महिन्याचा पगार शिवसेनेनं जमा केला आहे. पण राजीनामा अजून मान्य झालेला नाही. उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे, त्यामुळे आता ठाकरे काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.