राजकीय दबावामुळे ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्विकारला जात नाही?

Rutuja Latake : राजीनामा स्वीकारला गेला नाही तर शिवसेना ठाकरे गटाला दुसरा उमेदवार शोधावा लागू शकतो.
Rutuja LAtake
Rutuja LAtakeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंधेरीपूर्व पोटनिवडणूकीत नवेनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने राजीनाम्याशिवाय त्यांना ही पोटनिवडणूक लढवता येणार नाही. परंतु त्यांना निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी राजकीय दबावामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये अशी दबक्या आवाजात चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा राजकीय दबावामुळे स्वीकारला जात नाही? अशी चर्चा होताना दिसत आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पर्यायाने दुसरा उमेदवार शोधावा लागू शकतो. असे झाले तर भाजपला ही निवडणूक काही अंशी सोपी जाऊ शकते. शिंदे आणि फडणवीस यांची अशी योजना आहे का? अशी देखील चर्चा घडून येताना दिसत आहे.

Rutuja LAtake
ठाकरेंच्या अडचणी संपेना, 'मशाल'वर समता पक्षाचा दावा : वाद आयोगाच्या दारात!

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या के - पूर्व वॉर्डमध्ये कार्यरत आहेत. लटके यांनी आपल्या पदाचा 3 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. मात्र अजूनही त्यांचा राजीनामा मान्य करण्यात आलेला नाही.

Rutuja LAtake
ठाकरेंचे मुलखमैदानी तोफ भास्कर जाधवांना अटक होणार? गोंदियात तक्रार दाखल!

पालिकेचा नियम काय सांगतो?

मुंबई पालिकेच्या 1989 नियमावली नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायचा असल्यास, एक महिना आधी नोटीस द्यावी लागते.

राजीनामा देताना एक महिना नोटीस दिली नाही तर एक महिन्याचा पगार जमा करायचा असतो. ६७ हजार असा एक महिन्याचा पगार त्यांनी पालिकेकडे जमा केले आहे. राजीनामा मात्र अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही. उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहेत. पण, यामुळे ठाकरे गटापुढे नवं संकट उभे राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com