Bhaskar Jadhav on Ajit Pawar Death 
मुंबई

Bhaskar Jadhav: "...तर महाराष्ट्र पेटला असता", भास्कर जाधवांनी घेतली शरद पवारांची बाजू; अजित पवारांच्या निधनावर विधानसभेत शोक प्रस्ताव

Bhaskar Jadhav: विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर चर्चेदरम्यान ते बोलत होते.

Amit Ujagare

Bhaskar Jadhav: राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित होत असताना याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर या शंका-कुशंकांबाबत स्पष्टीकरणंही दिलं होतं, त्यांच्या या विधानाचं समर्थन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर चर्चेदरम्यान ते बोलत होते.

तर महाराष्ट्रात पेटला असता - जाधव

भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात अजितदादांचा अपघातच झाला हे मानायला तयार नाही. तुमचंही आणि माझंही मन मानायला तयार नाही. कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं आहे. पण त्या दिवशी शरद पवारांनी सांगितलं की, हा घातपात नाही, हा अपघातच होता. म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि शरद पवार वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हे लोण पोहोचलं असतं मग सरकारनं कितीही ताकद लावली आणि कोणीही लावली असती तरी कोणालाही ते कन्ट्रोल झालं नसतं. त्यामुळं शरद पवारांचं ते स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समायोजित वाटतं.

शरद पवार मांडतात ही भूमिका विसंगत नाही तर त्या त्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे. त्यामुळं अजितदादांचा घात झाला की अपघात झाला यामागचं सत्य मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावं, यापेक्षा मी अधिक काही बोलू इच्छित नाही, असं यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT