Ashwini Bidre Murder Case: पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात कुटुंबीयांची खळबळजनक मागणी; 'इच्छामरणा'ची राष्ट्रपतींकडं मागितली परवानगी

Ashwini Bidre murder case latest update: महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.
police officer murder case
police officer murder caseSarkarnama
Published on
Updated on

Shocking demand in Ashwini Bidre case: महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडं त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचाही आरोप या कुटुंबांन केला आहे.

police officer murder case
maharashtra sadan : मोठी बातमी! महाराष्ट्र सदनावर दहशतवादी सावट? बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली पोलीस ॲक्शन मोडमध्ये!

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे-गोऱ्हे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही, असा दावा या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10 वर्षे उलटले, न्यायालयात खून झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे. यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलिसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

police officer murder case
Iran US War : 'मिळेल त्या मार्गाने इराण सोडा'! युद्धाची चिन्ह दिसताच भारताकडून 'ॲडव्हायझरी' जारी; परिस्थिती गंभीर

एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com