Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

'' खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरेंना ...'' ; भाजप नेत्याचा टोला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उध्दव ठाकरे यांनी चिखली येथील शेतकरी मेळाव्यात जोरदार भाषण केले होते. त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर देखील सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी मी जर मुख्यमंत्री असतो तर महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढलं असतं असं विधान केलं होतं. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ( Bjp Leader Ashish Shelar Latest News)

भाजप नेते व आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले, जर खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर प्रथम क्रमाकांचे बक्षीस उद्धव ठाकरेंना मिळेल. इतके धादांत खोटं ते बोलतात. महिलांचा अपमान कुणीच करु नये आम्ही त्याचा निषेध करतो.

मात्र, महिलेच्या अपमानामुळे मंत्र्याला काढून टाकावं असं त्यांनी म्हटलं. पण त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करतो. काळा पैशाने तिची प्रॉपर्टी विकत घेतो, तोच काळा पैसा बॉम्बस्फोटात वापरलो जातो असं एनआयएने म्हटल्यानंतर देखील त्या मंत्र्याला ठाकरेंना काढावंसं वाटलं नाही अशा शब्दांत भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

सहकार आणि शिक्षक आघाडीच्यावतीने दहीसर पूर्व येथे जागर मुंबईचा या अभियानांतर्गत १७ वी सभा संपन्न झाली. या सभेला आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, सहकार आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जे. पी. मिश्रा, नगरसेवक जगदीश ओझा, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजेश बंडगर, माजी नगरसेवक नागेश कवठणकर, विधानसभा अध्यक्ष अरविंद यादव उपस्थित होते

'' आमच्या गल्लीबोळात १० नंतर बँजो वाजवला तर पोलीस येऊन गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतात. पण तिथे महेक सारखी मुलगी गेट वे ऑफ इंडियाला उभी राहून काश्मीर तोडण्याचे फलक दाखवते, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी त्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात साधा निषेधही व्यक्त केला नाही '' असेही शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT