वसंत मोरेंचं दुखणं नेमकं काय? निवडून न येण्याची भीती की डावलल्याची नाराजी

Vasant More News : पुणे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
Vasant More News
Vasant More NewsSarkarnama

Vasant More News : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) पुन्हा एकदा नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते नाराज झाले, असल्यचे म्हटले जात आहे. या नाराजीवर बोलताना मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली आहे. यापूर्वीही त्यांच्या नाराजीमुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईमध्ये गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. मात्र, पुण्यातील मनसेमध्ये पुन्हा एकादा नाराजीची चर्चा सुरु झाली आहे. मोरे यांना पुणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना भाषणच करू दिले नाही. यामुळे पुन्हा एकदा मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Vasant More News
राज्यपाल कोश्यारींसह मंत्री अब्दुल सत्तारांचाही राज ठाकरेंकडून समाचार; म्हणाले...

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटतट, विसरून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र, मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा न पटल्याने मोरे मध्यंतरी नाराज झाले होते. तेव्हापासून शहर मनसे पदाधिकारी आणि मोरे यांच्यातील विसंवाद वाढत गेला. स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याचा आरोप मोरे यांनी अनेकदा केला आहे. राज ठाकरे पक्ष कार्यालयात येतील तेव्हाच कार्यालयात जाईन, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. त्यातच आता नव्या वादाची भर पडली आहे.

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरुन नाराज झालेले मोरे दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चाही रंगली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्कही केला होता. मात्र, आपण राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे मोरे यांनी जाहीर केले होते. परंतु नियमीत नाराजीच्या चर्चांमुळे मोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्ष नेतृत्वाकडे चुकिचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने पुण्यामध्ये तीनचा वॉर्ड केला आहे. या प्रभाग रचनेमध्ये मोरे यांच्यासाठीचा प्रभाग कात्रजच्या घाटापर्यंत (कात्रज बोगदा) जोडला गेला आहे. त्यामुळे परसलेल्या प्रभागाने मोरे यांची पंचाईत केल्याचे सांगितले जात आहे. मोरेंना मानणारा पारंपरिक मतदार लांब करून त्यांनाही झटका देण्याची संधी या प्रभागरचनेतून साधली गेल्याचे दिसत असल्याचे जाणकार सांगतात.

मात्र, याआधीच्या म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही मोरेंच्या कात्रजमधील जुन्या प्रभागाचे तुकडे केल्याने त्यांना शेजारच्या प्रभागात लढावे लागले होते. परंतु आपली राजकीय कमान उंचाविण्यासाठी झटणारे मोरे जिंकले होते. या निवडणुकीतही पुन्हा प्रभाग फोडून मोरेंपुढील अडचणींचे बॅरिकेडस उभारले आहेत. या प्रभागाला मांगडेवाडी, खिलारेवाडी, भिलारेवाडी आणि येवलेवाडी जोडले आहेत. त्यामुळे मोरे नाराज नाहीत ना अशी चर्चाही पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नाराजीच्या चर्चांवर मोरे म्हणाले, माझे कार्यकर्ते नाराज आहेत. शहरात मनसेच्या शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कोअर कमिटीचे सगळे सदस्य होते. या मेळाव्या दरम्यान मंचावर असल्यामुळे बोलू द्यायला हवे होते, अशी भावना माझ्या कार्यकर्त्यांची आहे, असे मोरे यांनी सांगितले. मला त्या मंचावर बोलण्याची संधी मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.

Vasant More News
'एकनाथ शिंदेंनी रात्री फिरवलेल्या कांडीनंतर उद्धव ठाकरे सगळीकडे फिरतायेत'

तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, तुम्ही भाषण का केले नाही, असे मला माझे कार्यकर्ते विचार होते. भाषण करणाऱ्यांच्या यादीमध्ये माझे नावच नव्हते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मी कसे बोलणार, असा सवाल त्यांनी केला. तेथे उपस्थित नेत्यांनी मला बोलू द्यायला हवे होते. माझ्यासह इतर नेतेही तेथे उपस्थित होते, त्यांनाही बोलू द्यायला हवे होते, असेही मोरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com