Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "खरे शिवसैनिक असाल तर..."; शिवसेनेच्या आमदारांचं राऊतांना खुलं आव्हान

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Budget Session : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संपूर्ण विधीमंडळाला चोर म्हटले आहे. त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी संपूर्ण विधीमंडळाचा आपमान केला आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच संजय राऊत यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

विधानभवनाबाहेर शिवसेनेचे (Shivsena) आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट (Sanjay Shirsat), संतोष बागंर यांच्यासह इतर आमदारांनी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी त्यांनी राऊतांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली.

भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, "आम्ही येथे शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न मांडत आहे. आम्ही चोर असलो तर जनतेचे प्रश्न मांडणार कोण? चोर आम्ही आहोत की संजय राऊत हे आम्हाला सिद्ध करायचे आहे. जनतेचे प्रश्न आजचे उद्या मांडू; पण आमच्यावर डाग लागला तर तो पुसला जाणार नाही. त्यामुळे राऊतांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे."

पुढे गोगावले यांनी राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा, सुरक्षाही नाकारावी, असे आव्हान केले. ते म्हणाले, "आमची मते घेऊन राऊत राज्यसभेत खासदार झाले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल, नितिमत्ता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारावी. त्यानंतर समजेल की ते खरे शिवसैनिक आहेत की नाही. त्यांच्या वक्तव्याचे कुणीही समर्थन केले नाही."

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-भाजप सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट दिली आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो, अशी घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे विधिमंडळामध्ये जोरदार घमासान सुरू झाले.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात यावा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. याबाबत दोन दिवसात विचार करून निर्णय घेऊ असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. यावर आता पुन्हा राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT