<div class="paragraphs"><p>Hemant Nagrale&nbsp;</p></div>

Hemant Nagrale 

 
मुंबई

पकडलेल्या त्या तिघांकडून मिळाले महत्त्वाचे पुरावे; हेमंत नगराळेंनी केला मोठा खुलासा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून देशात बुली बाई प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. बुली बाई (Bullibai App) प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू मधून कुमार विशाल झा, उत्तराखंडमधील 18 वर्षीय श्वेता सिंग आणि तिसरा आरोपी मयंक रावतला अटक केली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

बुल्लीबाई (Bullibai App) आणि सुल्ली डील (Suli Deals) या अॅपवर काही विशिष्ट काही विशिष्ट समाजातील महिलांचे मार्फ केलेले फोटो टाकून त्यांची बोली लावली जात होती. हा धक्कादायक प्रकार समोर येताच संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून कारवाईची मागणी केली जात आहे. या समाजातील महिलांची बदनामी करण्यासाठी हा कट रचला गेल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.

याचवेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करताना आरोपींची नेमकी मोड्स ओपरेंडी काय होती, हे देखील सांगितलं आहे. बुली बाई या सोशल मीडिया अॅपवर (Social Media) एका विशिष्ट समाजातील काही महिलांचे फोटो मार्फ करत त्यांची बोली लावली जात होती. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेजेस सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. यात काही मुस्लिम महिला, सामाजिक कार्यकर्त्या, महिला पत्रकारांचाही समावेश होता.

या प्रकरणी काही महिलांनी पुढे येत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या अॅप आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी हे प्रकरण पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. 31 तारखेला हे अॅप लोड केल्यानंतर ऍप, आणि ज्या ट्वीटर हॅन्डलवरुन या ऍपची माहिती दिली जात होती. धक्कादायक म्हण जे ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या नावानं ट्विटर हॅन्डलही सुरु करण्यात आलं होतं.

या ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्सची माहिती काढून त्यांच्याकडून तपास केला असता त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. या प्रकरणात अटक केलेल्या तिघांपैकी दोघांना मुंबईतही आणण्यात आलं आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी विशाल झाइंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याची चौकशी केली जात आहे. श्वेता सिंह ही तरुणी या प्रकरणी संशियत आरोपी असून तिच्यासह मयंक रावत नावाच्या तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

हे वादग्रस्त अॅप एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो, असा संशयही मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणाचा तपास करत आहे. या वादग्रस्त अॅपीच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याने आरोपींवरकठोर कारवाई केली जाणार असल्याचा त्यांनी सांगितलं आहे.

त्याच बरोबर, अशा प्रकारच्या संवेदनशील घटना पुन्हा होऊ नये, यासाठीही सतर्कता बाळगण्याची आणि काळजी घेण्याचे आवाहन हेमंत नगराळे यांनी केलं आहे.बुली बाई अॅप आणि ट्विटर हॅन्डल ऑपरेटींग प्रकरणी काही इमेलही पोलिसांच्या हाती लागले असून त्यांचाही तपास केला जात आहे. त्याचबरोबर ज्यांना Appबाबत अधिक माहिती द्यायची असेल, किंवा तक्रार करायची असेल त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाशी संपर्क करावा, असंही आवाहन हेमंत नगराळे यांनी केंल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT