Kalyan Dombivli BJP News Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad : व्हा तयार...! कल्याण पूर्वेत भाजपचा विधानसभेसाठी एल्गार, आमदार गायकवाडांची बॅनरबाजी चर्चेत

शर्मिला वाळुंज

Dombivli, News, 28 July : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहे. शिवाय आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी देखील आतापासून जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे.

अशातच आता, कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या वतीने काही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर 'व्हा तयार... करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार' अस मजकूर लिहिण्यात आला आहे. हे बॅनर कल्याण पूर्वेत लावण्यात आले आहेत. तसंच यावर आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचाही फोटो लावण्यात आला आहे.

त्यामुळे आता हे बॅनरवरुन विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसंच यंदाच्या विधानसभेसाठी सुलभा गायकवाड या उमेदवार असणार असल्याचंही आता बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत भारतीय जनता पक्षाने (BJP) बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सुलभा गायकवाड यांनी देखील विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी केल्याचं आता या बॅनरच्या माध्यमातून उघड झालं आहे.

आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपचे काही नेते देखील 288 जागा लढवण्याची भाषा करत आहेत. नुकतीच कल्याण पूर्वेत भाजपच्या शहरांध्यक्षांनी कल्याण लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील पाचही जागा भाजपने लढवाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.

अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.28 जुलै) रोजी भाजप कल्याण जिल्हा कोअर कमिटी व जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत.

या बैठकीच्या निमित्ताने शहरात भाजपचे आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कोअर कमीटीचे स्वागत करणारे बॅनर लावले होते. या बॅनरवर 'व्हा तयार करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार' असा मजकूर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत कल्याण पूर्वेतून सुलभा गणपत गायकवाड या विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT