Assembly Election : 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक; भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरणार...

BJP Yogi Adityanath By Polls : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला. 80 पैकी केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे.

भाजपमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरणार असल्याचे मानले जात आहे. मागील निवडणुकीत लोकसभेत वर्चस्व गाजवलेली भाजप यावेळी दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याने मोदींसह योगींचा करिष्मा चालला नसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

BJP
C P Radhakrishnan : 'तामिळनाडूचे मोदी' समजले जाणारे सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी

योगींना पुन्हा आपला करिष्मा दाखवून देण्यासाठी दहा मतदारसंघापैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून अप्रत्यक्षपणे योगींवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे योगींचे मुख्यमंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चांना विरोधकांकडूनही खतपाणी घातले जात आहे.

ओबीसी नेत्यांमध्ये चिंता

लोकसभा निवडणुकीत भाजपला ओबीसींसह दलित मते अपेक्षेपेक्षा खूप कमी मिळाली. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. परिणामी, दहा मतदारसंघातील निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो, असे या नेत्यांना वाटत आहे.

BJP
NITI Aayog On Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या आरोपांवर आता थेट 'NITI' आयोगाचीही प्रतिक्रिया आली समोर!

दहापैकी पाच जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. तर उर्वरित पाच जागा भाजप आणि मित्रपक्षांकडे होत्या. मात्र, असे असले तरी लोकसभेनंतर गणित बदलले आहे. एनडीएकडील पाच जागा असलेल्या मतदारसंघातही इंडिया आघाडीने यश मिळवले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल, हे स्पष्ट आहे.

कुंदरकी, फूलपूर, खैर, कटेहरी, सीसामऊ, मिल्कीपूर, मीरापूर, गाजियाबाद, मझावा आणि करहल या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. सीसामऊ वगळता इतर नऊ मतदारसंघातील आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचाही समावेश आहे. तर सीसामऊच्या आमदारांना एका प्रकरणात कोर्टाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com