Amarnath Rajurkar, Abhijit Wanjari sarkarnama
मुंबई

अशोक चव्हाणांच्या कट्टर समर्थकाला विधान परिषदेत मानाचे स्थान

अमरनाथ राजूरकर Amarnath Rajurkar नांदेड Nanded स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत वंजारी Abhijit Wanjari नागपूर Nagpur पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते पदी आमदार अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोद पदी आमदार अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात याबाबतची घोषणा केली.

अमरनाथ राजूरकर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत बंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले व वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी शिफारस केली होती.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. आमदार अमरनाथ राजूरकर व अभिजीत वंजारी यांच्या नियुक्तीचे दोन्ही सभागृहातील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे. राजूरकर हे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नांदेड जिल्ह्यात अशोकरावांना त्यांची सावलीसारखी साथ असते. त्यामुळे विधान परिषदेतील मोठे पद राजूरकर यांना मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT