एसटी आंदोलनावर तोडगा निघणार? अधिवेशन संपण्यापूर्वी अनिल परब मांडणार भूमिका

अनिल परब (Anil Parab) यांचे विधानसभेत आश्वासन
Transport Minister Anil Parab
Transport Minister Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे (ST Strike) अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. यामुळे एसटी कर्मचा-यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आज विरोधीपक्षातर्फे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर सरकार याबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करुन आपली भूमिका मांडेल, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले.

शेलार म्हणाले, राज्यात एसटीचा संप बेमुदत सुरू असून या संपकरी कर्मचा-यांपैकी सुमारे १०० कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच अन्य कर्मचारी उदरनिर्वाह करण्यासाठी वेठबिगार म्हणून काम करतो आहे, ट्रक चालवत आहेत. तसेच एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. तसेच आता परिक्षा सुरू होत असून विद्यार्थी परिक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Transport Minister Anil Parab
संजय राऊत म्हणाले; देशमुखांबाबत घाईच झाली, पण मलिकांचा राजीनामा घेणार नाही...

न्यायालयात तारखांवर तारखा पडत असून याबाबत सरकारकडून ही कोणताही तोडगा निघत नाही. उलट पक्षी सरकार संपकरी एसटी कर्मचा-यांना धमकी देऊन आम्ही तुम्हाला कामावरुन कमी करू, दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी भरु असे करीत आहे. त्यामुळे हा विषय राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्वाचा व जिव्हाळ्याचा असल्याने आजचे सभागृहाचे कामकाम बाजूला ठेवून याबाबत चर्चा करावी, अशी मागणी करीत शेलार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

Transport Minister Anil Parab
स्वाभिमानीत फूट? राजू शेट्टींच्या विरोधात त्यांचाच एकमेव आमदार

मात्र, अध्यक्षांनी तो नाकारला त्यामुळे भाजप (BJP) आमदार आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरु लागले. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करावे, अशी मागणी झाली. अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारच्या वतीने उत्तर देताना हे अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार याबाबत आपली भूमिका स्पष्‍ट करेल असे त्यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com