NCP Latest News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह बंड केलेल्यांवर जोरदार टीका केली. तसेच जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून नियक्तीचे संकेत दिले.
"अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षाचे प्रचारप्रमुख व्हावं, मग आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू", असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर थेट पक्षाच्या पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी देण्याबाबत भाष्य केलं.
जयंत पाटील म्हणाले, "या बैठकीला जमलेल्यांपैकी कुणालाही वाहतुकीचे पैसे देऊन या ठिकाणी आणलेलं नाही. शरद पवार यांनी अशा अनेक संकटांना तोंड दिलेले आहे. पण असे अनेक संकट आले, त्या-त्या वेळी शरद पवारांनी बाजी पलटवण्याचं काम केलेलं आहे.
हा पक्ष 25 वर्षात पदार्पण करत आहे. मात्र, हा पक्ष तोडण्याचं काम अनेकवेळा करण्यात आलं. आज जे आपल्याला सोडून गेले आहेत, त्याचं वाईट वाटतं. ते का तिकडे गेले, यांची विवंचना करण्याचे काम झालेलं आहे", असं त्यांनी यावेळी सांगितलं.
"प्रदेशाध्यक्ष म्हणून मला पाच वर्ष झाली. मी शरद पवारांना सांगितलं होतं की, मी पाच वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेताल तो मला मान्य राहिल. मी शरद पवार यांच्या विचारापासून कधीही बाजूला जात नाही. पवार साहेबांचं वय कितीही झालं तरी या नेत्याचा भारतात दरारा आहे", असं म्हणत जयंत पाटील यांनी पक्षात बंड केलेल्यांना थेट इशाराच दिला.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.