Supriya Sule Speech : लढाई आता सुरु झाली आहे ; सुप्रिया सुळेंचा इशारा

Maharashtra Political Crisis : यातून हरुन जायचं नाही. पक्ष आहे पुन्हा बांधू.
Supriya Sule Speech :
Supriya Sule Speech : Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule Speech : जेव्हा घरावर जेव्हा अडचण येते तेव्हा आई वडिलांसोबत सर्वात आधी लेक उभी राहते. परिस्थिती आहे. पण यातून हरुन जायचं नाही. पक्ष आहे पुन्हा बांधू. जे आहेत त्यांच्यासाठी आनंद आहे. पण आता जे गेले त्यांना शुभेच्छा आहे. अशा शब्दांत सुप्रिया सुळेनी आपली भूमिका मांडली आहे. त्या वाय.बी. चव्हाण सेंटर मध्ये बोलत होत्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा झाला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१९ मी विसरले नाही, ते विसरले असतील. २०१९ मध्ये ११ सीट राष्ट्रवादीला मिळाल्या, कुणालाही वाटेल कुणी केलं असेल पण सर्वे मी पाहिलाय. हाच ८० वर्षांचा योद्धा लढला. जेव्हा जेव्हा या देशाचा इतिहास लिहीला जाईल, तो फोटो या देशाच्या राजकारणाच्या इतिहासात असेल आणि परवाचाही असेल.

Supriya Sule Speech :
Chitra Wagh News : ज्यांचा पक्षच ‘फूलआऊट’ झालाय, त्यांना सारं काही ‘डाऊटफूल’… चित्रा वाघांचा ठाकरे गटावर निशाणा

शपथविधी झाल्यानंतरही लोक म्हणत होते आता काय होणार, राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला, त्यावर एकच उत्तर आलं शरद पवार. पण गंमत अशी आहे की त्या बॅनवर पण शरद पवारच आहेत. पण तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ, जे गेले त्याना शुभेच्छा.

पण आता लढाई आता सुरु झाली आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्या भाजपविरोधात आता लढाई सुरु झाली आहे. कैसे तुमने खाया आज के बाद तुमको महाराष्ट्र मे खाने नही दुंगी... असा थेट इशारा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला दिला आहे. इतकेच नव्हे तर आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना संधी मिळेल. आता राष्ट्रवादीचा एकच शिक्का आणि त्याचं नाव - शरद पवार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com