Aditya Thackeray News, Corona News Updates, Corona 4th Wave news
Aditya Thackeray News, Corona News Updates, Corona 4th Wave news sarkarnama
मुंबई

महाराष्ट्रात ‘चौथ्या लाटे’ ची भीती ; मास्क बंधनकारक करण्याचे ठाकरेंचे संकेत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाने (corona)डोके वर काढले आहे. दैनंदिन रुग्णसंख्या पंधराशेच्या आसपास पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी चाचपणी सुरू आहे.(Increasing corona patients in Maharashtra)

दररोज एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारवरील ताण वाढू लागला आहे. खबरदारी न घेतल्यास चौथ्या लाटेलाही सामोरे जावे लागू शकते, असा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Corona News Updates in Marathi)

कोविडची ही बहुधा चौथी लाट आहे. लवकरच पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करणार’, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेनी ही बातमी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही सर्व लोकांना बाहेर पडताना मास्क घालण्यास सांगत आहोत. आम्ही अद्याप मास्क घालणे अनिवार्य केलेले नाही. मात्र, लवकरच ते अनिवार्य करण्यात येणार आहे. मी लोकांना आवाहन करतो की, कोरोना लसीचा बूस्टर डोस वेळेवर द्यावा."

मास्क वापरण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, "‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याशिवाय आम्हीही याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही.”

शाळा सुरु होणार

“कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्याने शाळा सुरू केल्या जातील,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दिली. वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा १३ जून, तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून भरत आहेत.

  • शनिवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 1357 नवीन रुग्ण आढळले आहेत.

  • गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

  • शुक्रवारी महाराष्ट्रात संसर्गाचे 1134 रुग्ण आढळून आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

  • राज्यात सध्या 5888 सक्रिय रुग्ण आहेत.

  • आतापर्यंत येथे 1,47,865 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • रविवारी देशात 4270 नवीन रुग्ण नोंदवले गेले.

  • देशातील संक्रमितांची संख्या आता 4,31,76,817 वर पोहोचली आहे.

  • भारतात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 24,052 झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT