Rajyasabha Election : मनसेचे मत कुणाला ? ; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राजकीय वर्तुळात आहे.
Raju Patil
Raju Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election 2022) महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मनधारणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यांनी आपल्याला मदत करावी, यासाठी आघाडी आणि भाजप प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं निवडणूक रंगतदार होणार आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राजकीय वर्तुळात आहे.याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी 'राजसाहेब जो आदेश देतील तो,' असे बोलत सध्या अधिक बोलणे टाळले आहे.

मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप -मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे.

Raju Patil
'अकेला देवेंद्र क्या करेगा' म्हणणाऱ्या तिघांचा त्यांनी धुर काढलाय ; चित्रा वाघांच्या कानपिचक्या

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिंडार पाडली आहे. राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते. दरम्यान महापालिका निवडणुक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी राज साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यामुळे आता राज यांच्या आदेशानुसार च सूत्र हलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते काय निर्णय घेतात हे पाहणे औतूसक्याचे ठरेल.

भाजपनं राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले आहेत त्यामध्ये पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होईल. राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com