Terror alert Mumbai coast Sarkarnama
मुंबई

Terror alert Mumbai coast : महाराष्ट्र पोलिस दलात वेगवान हालचाली, समुद्र किनारपट्टीलगत 'अलर्ट मोड'वर; 'ड्रोन'च्या नजरेसह सागरी गस्तीत वाढ

Police Security Tightened in Mumbai After Pahalgam Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई कोकण पालघर समुद्र किनारपट्टीलगत महाराष्ट्र पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

Pradeep Pendhare

Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिला जाईल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर, संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई, कोकण समुद्र किनारपट्टीवर पोलिस दलानं गस्त वाढवली असून, ड्रोनद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. समुद्र किनारपट्टीलगत तटरक्षक दलाच्या नौकांनी गस्त वाढवली असून, खबऱ्यांकडून वेगवेगवेळी माहिती मिळवली जात आहे. रात्रीच्या गस्तीसाठी शस्त्रधारी पथक तैनात करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना आणि त्यामागील सूत्रधाराला दिली जाईल, असा इशारा दिल्यानंतर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस देखील 'अलर्ट मोड'वर आलं आहे. मुंबई पोलिस दल अॅक्शन मोडवर असून, समुद्र किनारपट्टीलगत गस्त वाढवली आहे.

मुंबई (Mumbai), कोकण, पालघर या सागरी सीमेवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पालघरच्या समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नजर ठेवली जात आहे. पालघर पोलिसांबरोबरच तटरक्षक दलाने सागरी गस्त वाढली आहे. ड्रोनमार्फत समुद्रातील हालचालींवर देखील पालघर पोलिसांची नजर वाढवली आहे.

पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी समुद्रात संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट मोडवर असून, खबऱ्यांसह विविध मार्गांनी लक्ष ठेवलं जात आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची देखील संशयास्पद हालचालींची माहिती काढण्यासाठी मदत घेतली जात आहे, अशी माहिती दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दहशतवादाविरोधात सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. राजकीय, सामाजिक संघटनांकडून निषेध नोंदवला जात आहे. भारताविरोधीच्या कुरापतीविरोधात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केला जात आहे. हिंदू-मुस्लिम एकत्र येत, पाकिस्तानविरोधात कारवाईच्या मागणी होत आहे. सरकारला तसे निषेधाचे निवेदनं दिली जात आहे. देशात संतापाची लाट असतानाच, संपूर्ण पोलिस दल देखील अलर्ट मोडवर आहे. विशेष करून, मुंबई पोलिस दलाने सागरी किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे. यासाठी मुंबई पोलिस दल अत्याधुनिक तंत्राचा पुरेपुर मदत घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT