Mumbai Politics : मणिपूरवरून भाजपला धारेवर धरलेल्या विरोधी पक्षांची आघाडी आता जास्तच आक्रमक झाली आहे. आतापर्यंत सत्ताधारी भाजपवर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीने आता थेट मणिपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती नुकतीच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. INDIA चं एक शिष्टमंडळ दोन दिवसांसाठी मणिपूरमध्ये जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे. आपणही या शिष्टमंडळासोबत मणिपूरला भेट देण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मणिपूरच्या हिंसाचाराप्रकरणी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळ्या रंगाचे ड्रेस घातले होते. यावर भाष्य करताना सावंत म्हणाले, मी आयुष्यात पहिल्यांदा काळा शर्ट घेतला आहे. मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटना या निर्घृण आहेत. अजूनही मणिपूर धुमसत असतानाही केंद्र सरकार मात्र ढिम्म आहे.पण पंतप्रधान एका शब्दाने बोलत नाहीत हे देशाचं दुर्देव आहे.
याचवेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीची म्हणजेच INDIA ची पुढची मीटिंग मुंबईत होणार असल्याचंही म्हटलं आहे. 'इंडिया'ची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत बैठक होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केलं. त्यामुळं त्याच यजमान पद आमच्याकडे असल्याचंही अरविंद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजप कायम इलेक्शन मोडवर असते. पण पुन्हा निवडून येण्याची गॅरंटी ही पक्षाची नाही व्यक्तीची आहे. हे चित्र हुकूमशाहीकडे घेऊन जाणार आहे. पण 2024 ची निवडणूक ही लोकशाही जिवंत आहे की नाही हे ठरवणारी अंतिम निवडणूक असेल, हे उद्धव ठाकरे यांनीदेखील सांगितलं असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.