Pakistani Citizens Ordered to Leave India Sarkarnama
मुंबई

Pahalgam Terror Attack : नागपूर, मुंबई अन् पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांना राज्य सरकारनं शोधलंच; 48 तासांनंतर भारतात राहण्यास बंदी!

Pakistani Citizens Ordered to Leave India : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सार्क व्हिसा अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी पाकिस्तानला हाकलून द्या, अशी कठोर भूमिका घेतली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Apr : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सार्क व्हिसा अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी पाकिस्तानला हाकलून द्या, अशी कठोर भूमिका घेतली आहे.

तर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती जमा केली आहे. त्यानुसार आजा 55 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्र सरकारने शोधले असून त्यांना 48 तासानंतर भारतात राहत येणार नाही.

त्यामुळे त्यांना लवकरात लवकर भारत सोडून जावं लागणार आहे. तर राज्य सरकारने शोधलेल्या पाकस्तानी नागरिकांमध्ये नागपूरातील 18, ठाणे 19 आणि जळगावातील 12 जणांचा समावेश आहे.

तर पुण्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांना देखील देश सोडावा लागणार आहे. यासह मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी एका पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या 55 जणांना लवकरात लवकर देश सोडावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT