Narendra Modi Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT BJP Clash : बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका? संतापलेले उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपची तेवढी लायकी आहे का?"

Asia Cup UAE India vs Pakistan Cricket : यूएईमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (ता.14) भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. ठाकरेंच्या या भूमिकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी जावेद मियाँदाद आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा संदर्भ दिला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Sep : यूएईमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (ता.14) भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. ठाकरेंच्या या भूमिकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर झालेल्या भेटीचा संदर्भ दिला होता.

मात्र, भाजपने जावेद मियाँदाद आणि बाळासाहेब ठाकरे भेटीवरून भाजपने केलेल्या ओरोपाला उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. भाजपने लायकीत रहावे, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. पण अजूनही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव भरलेले नाहीत. या हल्ल्यातील शहीद जवानांचे रक्त सुकलेले नाही. या हल्ल्यानंतर आम्हाला वाटलं की, पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे होतील. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं होतं.

दरवेळी पाकिस्तानकडून हल्ला होतो, आपले सैनिक लढतात काही शहीद होतात. पण डोनाल्ड ट्रम्प सांगतो की त्यांनी युद्ध थांबवलं. एकदा नीरज चोप्रा यांनी पाकिस्तानी प्रशिक्षक घेतला तर त्या प्रशिक्षकाला देशद्रोही ठरवलं होतं आणि आता त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळतोय? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

जो पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत आहे, त्याच्याशी आपण संबंध ठेवतो? असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, त्यांनी या सामन्यावर बहिष्कार घालावा आणि देशाला योग्य संदेश द्यावा, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपचे नेते बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेत आहेत का? असा सवाल करत भाजपची एवढी लायकी आहे का? त्यांनी लायकीत राहावे, असा इशाराच ठाकरेंनी दिला. शिवाय मी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने या शब्दाचा वापर करत असून ज्यांना बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका आहे, त्यांनी लायकीत राहावे.

बाळासाहेब कुणाच्या घरी गेले नव्हते. तर जावेद मियाँदाद स्वतः इथे आला होता आणि बाळासाहेबांनी त्याच्या तोंडावर सामना होणार नाही, असं सुनावलं होतं, असं ठाकरेंनी सांगितलं. शिवाय जगभरात खासदारांचे शिष्टमंडळ पाठवून जे साध्य झाले नाही.

ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवून देऊ शकलो असतो की, दहशतवादाच्या विरोधात आम्ही आहोत. पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन देणारा देश असून जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी कारवाया थांबवत नाही. तोपर्यंत आम्ही पाणीच काय तर कोणतेही संबंध ठेवणार नाही. हीच भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती, असंही ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT