Ajit Pawar : कुर्डूतील व्हिडिओवर अजितदादा पुन्हा बोलले; म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय...'

Ajit Pawar on Kurdu Case : सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील दमबाजीच्या प्रकरणावर अडचणीत सापडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News 13 Sep : सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील दमबाजीच्या प्रकरणावर अडचणीत सापडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. मी माझी भूमिका मांडली असून मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

कुर्डू येथील अवैध मुरूम उपसा प्रकरणी परीविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा यांनी कारवाई केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या फोनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही कारवाई रोखण्याची सूचना संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला केली होती.

संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने अजितदादांना स्वत:च्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले असता उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला होता.

Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी पत्रकार परिषद घ्यावी; यासाठी भुजबळ, मनोज जरांगे अन् एकनाथ शिंदेंनाही बोलवावं, राऊत नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांनी त्या प्रकरणी ट्विट करत खुलासाही केला होता. मात्र, विरोधी पक्षाने अजित पवार यांच्यावर टीका करण्याची ही संधी सोडली नव्हती. त्या प्रकरणावर पुण्यात बोलताना आज अजितदादांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

Ajit Pawar addressing the media in Pune over the viral Kurdu case video, giving clarification on the alleged intimidation incident.
Nilesh Lanke news : विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारी नाही, उटल त्यांना..; नीलेश लंकेंकडून झेडपीचं 'प्लॅनिंग' सुरू

मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतलीय

पुण्यातील माध्यम प्रतिनिधींनी त्यांना कुर्डू प्रकरणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'मला जे उत्तर द्यायचं आहे ते मी दिलं आहे. तसंच ट्विट देखील केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे की, अजित पवारांनी त्या बद्दलची जी काही भूमिका मांडायची आहे ती मांडली आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.' असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com