Narendra Modi, Pahalgam terror attack Sarkarnama
मुंबई

Pahalgam Terror Attack : PM मोदी जाता जाता पाकिस्तानचे 4 तुकडे करतील, पण विरोधकांनी 'तो' मुर्खपणा करू नये...; ठाकरेंच्या सामनातील अग्रलेख चर्चेत

PM Modi’s Directives to Armed Forces : पाकिस्तान हा कमजोर, कमकुवत देश असून तो धर्मांध टोळ्यांच्या हातात आहे. शिवाय त्यांचे लष्कर भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्या उलट भारतीय सैन्यात निष्ठा, नीती, संयम आणि शौर्याचा अपूर्व मिलाफ आहे. त्या जोरावर ते कोणत्याही कठीण प्रसंगाशी सामना करू शकतात.

Jagdish Patil

Mumbai News, 02 May : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. केंद्र सरकार देखील पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे.

त्यामुळे आता भारत-पाकमधील संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठका घेत तुम्हाला हवं ते करा, असं म्हणत पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यामुळे भारत आता पाकविरोधात काहीतरी मोठी कारवाई करणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

तर देशातील सर्व विरोधकांनी देखील देशहितासाठी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या असलेल्या सामनामधून पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेली भूमिका यावर भाष्य केलं आहे. तर सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदी जाता जाता पाकिस्तानचे तुकडे करून जातील, असं देखील म्हटलं आहे.

सामनामध्ये लिहिलं की, पहलगामचा बदला कसा घ्यायचा याबाबत पंतप्रधान मोदींनी तीन्ही सैन्य दलांना सर्वाधिकार दिले आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत काय करायचे याचा निर्णय राजकीय इच्छाशक्तीनुसार पंतप्रधान मोदींना घेता आला असता. कारण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा ते सातत्याने करतात.

शंभर टक्के विजयाची गॅरंटी

तर घरात घुसून मारायचे की नाही हे ठरत नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा देखील साधला. 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जनरल सॅम माणेकशॉ यांना भेटीसाठी बोलावले होते. तेव्हा जनरल माणेकशॉ यांनी युद्धास करण्यास नकार दिला. सेना युद्धासाठी पूर्णपणे तयार नसल्याचे त्यांनी गांधी यांना सांगितलं आणि त्यांनी सहा महिन्यांचा वेळ मागितला, पण शंभर टक्के विजयाची गॅरंटी दिली.

सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालीच युद्ध लढले आणि त्यात पाकिस्तानचा दारुण पराभव देखील झाला. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले व तो निर्णय इंदिरा गांधी यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर घेतला. युद्ध कसे व कोठे करायचे हे सर्वाधिकार पंतप्रधान गांधींनी भारतीय सैन्यप्रमुखांनाच दिले, पण युद्ध हवे हा निर्णय इंदिरा गांधी यांचा होता, अशी आठवण करून देत आता मात्र, युद्ध करायचे की कसे हे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैन्यावर सोडल्याचं देखील सामनात नमुद केलं आहे.

कश्मीर पूर्णपणे सुरक्षित नाही?

दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कश्मीर खोऱ्यातील 48 पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय म्हणजे कश्मीरात गेलेल्यांच्या सुरक्षेबाबत सरकारला खात्री नसून कश्मीर पूर्णपणे सुरक्षित व दहशतवादमुक्त झाल्याचा सरकारचा दावा खरा नव्हता, अशी टीकाही करण्यात आली आहे.

यावेळी पाकिस्तान हा कमजोर, कमकुवत देश असून तो धर्मांध टोळ्यांच्या हातात आहे. शिवाय त्यांचे लष्कर भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्या उलट भारतीय सैन्यात निष्ठा, नीती, संयम आणि शौर्याचा अपूर्व मिलाफ आहे. त्या जोरावर ते कोणत्याही कठीण प्रसंगाशी सामना करू शकतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पाकड्यांशी लढण्याचे सर्वाधिकार सैन्याला दिले हे बरे झाले, असं म्हणत मोदींच्या निर्णयाचं स्वागत देखील केलं.

मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील

तर यावेळी मोदी आता राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील. त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहायला हवे, असं आवाहन करत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत. कश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे.

सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन घेऊन काय साध्य करणार? असा सवाल करत मोदी यांनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यामुळे कश्मीरचे काय? पाकिस्तानला धडा शिकवणार काय? हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये, असं म्हणत सामनातून विरोधकांवरच निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT