Shivsena Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उरले-सुरले नगरसेवकही फोडले

Navi Mumbai corporators Join Shivsena : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचं काम शिवसेनेच्या फुटीपासून सुरू केलं ते अद्याप सुरूच असल्याचं दिसत आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 02 May : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचं काम शिवसेनेच्या फुटीपासून सुरू केलं ते अद्याप सुरूच असल्याचं दिसत आहे.

मागील अनेक दिवसांत राज्यभरातील अनेक शिवसैनिक, माजी आमदार आणि काही पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. अशातच आता गुरुवारी (ता.01) एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Amit Shah warning : आधीच धास्तावलेल्या पाकिस्तानाला आता अमित शहांचाही कडक अन् सूचक इशारा, म्हणाले...

नवी मुंबई आणि ठाण्यातील 55 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ठाकरे गटाचे दहा नगरसेवकांचा समावेश आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील आनंदाश्रमात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Amit Shah warning : आधीच धास्तावलेल्या पाकिस्तानाला आता अमित शहांचाही कडक अन् सूचक इशारा, म्हणाले...

दरम्यान, या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुमचे सर्वांते मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईतील एकूण 55 नगरसेवक दाखल झाले आहेत. या सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही, असं आश्वासन त्यांनी या नगरसेवरकांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com