मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) अचानक भेट झाली. या भेटीदरम्यान, या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि माझी कोणतीही भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण देत, त्यांनी या भेटीचा दावा फेटाळून लावला.
अशात दूसरीकडे आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. या चर्चांदरम्यान खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. ''आपण काँग्रेससंदर्भात कोणतंही भाष्य करणार नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत येणार आहे अशी चर्चा आहे.
ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध करुन आमदार शिवसेनेतून बाहेर पडले तेच काँग्रेसचे नेते तुमच्या सोबत येत असतील तर, असाही प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता शिंदेंनी “असं कुठे होतंय का? मला तर माहिती नाही,” असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदेंनी पत्रकारांना केला.
अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मी काँग्रेसबद्दल काही बोलत नाही. पण कॉंग्रेसमध्ये त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करणे हा माझा स्वभाव नाही. आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
तुमच्यासोबत येऊन जी इतर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याची हिंमत केली, तशी काँग्रेसमधील आमदार दाखवतील का? अशा अर्थाचा प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंगे म्हणाले. यावर उत्तर देताना, “आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही. जनतेच्या मनातल्या भावना जागृत केल्या. अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आता होत आहे. आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.