MNS| ज्येष्ठ महिलेला मारहाण प्रकरणी मनसेची मोठी कारवाई

MNS| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मुंबादेवी येथे एका महिलेला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती.
MNS|
MNS|
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मुंबादेवी येथे एका महिलेला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. इतकेच नव्हे तर त्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. या प्रकरणी पोलिसांनी मुंबादेवी विभागातील कामाठीपुरा परिसरात पक्षाचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांच्यासह आणखी दोन जणांना ताब्यात घेत कारवाई केली.

MNS|
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार

या घटनेनंतर आता मनसेनेही संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत मनसेने विनोद अरगिले याची पदावरुन हकालपट्टी केली आहे.''मनसेत महिलांना नेहमीच आदर व सन्मान दिला जातो. काल मुंबादेवी विभागातील कामाठीपुरा परिसरात पक्षाचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. महिलांवरील हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही. पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत अरगिले यांना पदमुक्त केले आहे.

नेमके प्रकरण काय?

बुधवारी गणेशोत्सवानिमित्त मुंबादेवीत गणपती मंडप उभारण्याचे काम सुरू होते. यावरुन हा वाद झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी याठिकाणी असलेल्या एका मेडिकलसमोर पदाधिकारी मंडपाचा बांबू लावण्यासाठी गेले होते. यावेळी मेडिकल चालक प्रकाश देवी यांनी अरगिले यांना बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी दोघांमध्येही वाद झाले त्यातून विनोद अरगिले यांनी महिलेला मारहाण केली.

या प्रकरणानंतर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी देखील मनसेवर टीका केली होती. ''हिंदुत्वाच्या नव्या भूमिकेचे हे सध्याचे स्वरूप आहे. राज ठाकरेंच्या पक्षातील गुंडाने एका वृद्ध महिलेला मारहाण केली. आता मनसेला गुंडगिरी करून गमावलेला जनाधार परत मिळवायचा आहे का? असा सवालही त्यांनी मनसेला विचारला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन वृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com