Uday Samant On Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप काल रविवारी (१७ मार्च) शिवाजी पार्क येथील मैदानावर झाला. समारोपाच्या जाहीर सभेसाठी इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. कालच्या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या भाषणांवर (Uddhav Thackeray) उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जोरदार टीका केली आहे. “कालच्या सभेला जमलेली गर्दी पाहता ती षण्मुखानंद सभागृहात घ्यायला पाहिजे होती,” असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना सामंत (Uday Samant) म्हणाले, "काल सभेला जमलेल्या गर्दीतून दिसून आले की, शिवाजी पार्कवर राहुल गांधी आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या लोकांसाठी गर्दी होत नाही. सामनासह इतर पेपरमध्ये आलेल्या फोटोमध्ये तिथे किती गर्दी होते ते दिसून आलं. काल जमलेली गर्दी ही नैराश्यातून जमलेल्या लोकांची गर्दी होती, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) धारावीचा प्रश्न मांडला, मात्र बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं झोपडीतला प्रत्येक माणूस चांगल्या घरात गेला पाहिजे. उबाठाच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव एकदा तरी घेतलं, मात्र राहुल गांधींनी एकदाही बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही, असंही सामंत म्हणाले.
“आम्ही एकत्र असताना उद्धवजी पाऊण तास भाषण करायचे, मात्र काल त्यांना फक्त 5 मिनिटं बोलायला सांगणं हा उद्धव ठाकरेंचा अपमान नाही का? असं म्हणत सामंतांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर उद्धव ठाकरे समान नागरिक कायद्याचं समर्थन करणार का? असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला. शिवाय कालच्या सभेपेक्षा माझ्या रत्नागिरीतील सभेला दुप्पट गर्दी असते, असा टोलाही त्यांनी इंडिया आघाडीला लगावला.
(Edited By - Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.