Rahul Gandhi News : मोदींच्या सत्तेत संवाद संपला म्हणून माझी यात्रा... ; राहुल गांधींनी लोकसभेचे रणशिंग फुंकले!

Rahul Gandhi News : आम्ही सर्व सामान्यांचं आवाज आहोत...
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News :Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Speech in Mumbai : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडा न्याय यात्रेला सांगता आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती इंडिया आघाडीची जाहीर सभेने होणार झाली आहे. यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे नेते यासाठी उपस्थित आहेत. यावेळी राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रा का काढावी लागली? याचे कारण सांगत त्यांनी लोकसभा लढाईचे रणशिंग फुंकले. (Latets Marathi News)

Rahul Gandhi News :
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

"देशाच्या सर्व भागातून आम्ही भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा केली. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पायी चाललो. खरंतर ही यात्रा आम्हाला करावी लागली. जर मला आठ-दहा वर्षांपूर्वी विचारलं गेलं असंत, तर तेव्हा मी यात्रा करु शकलो नसतो. ही यात्रा आम्हाला का करावी लागली. कारण देशाची संवाद माध्यम ते मेन स्ट्रीम मीडिया असेल, सोशल मीडिया असेल आज देशातल्या लोकांच्या हातात नाही. या मीडियात लोकांचे प्रश्न, बेरोजगारी, हिंसाचारग्रस्त प्रदेश, शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही, म्हणून आम्हाल ही यात्रा करावी लागली. या यात्रेत एकटा मी चालत नव्हतो. सर्व लोक माझ्या सोबत होते, असे राहुल गांधी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi News :
MA khan : शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये गळती सुरु : माजी खासदाराचा राजीनामा

"आम्ही आघाडीतले सर्व पक्ष एका राजकीय पक्षाच्या विरुद्द लढत आहोत असं बोललं जातं. पण ते खरं नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी लढत नाही. आम्ही एका व्यक्तिविरोधातही लढत नाही. खरंतर एका व्यक्तिला चेहरा बनवून वर पाठवलं आहे. आम्ही एका शक्तीशी लढत आहोत. आम्ही अन्यायकरांशी शक्तीविरोधात लढत आहोत," असेही गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com