Aaditya Thackeray, Uday Samant latest News Sarkarnama
मुंबई

Uday Samant: आदित्य ठाकरेंच्या आरोपावर उद्योगमंत्री सामंतांचे प्रत्युत्तर ; म्हणाले...

Aaditya Thackeray : वेदांतापेक्षा चांगला प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्रात आणणार...

सरकारनामा ब्यूरो

Uday Samant : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे(Aditya Thakare) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या या आरोपाला उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) यावर एमओयू (MOU) झालेला नव्हता. तो करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुचनेनंतर हायपावर कमिटीची बैठक १५ जुलैला झाली. या प्रकल्पाबाबत जर कोणी पत्रकार परिषद घेत असेल तर त्यांनी दाखला द्यावा. आणि प्रकल्पावर एमओयू झाला असेल तर त्यावर अनिल अग्रवाल आणि शासनाची सही आहे का हेही त्यांनी दाखवाव, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधाला. (Aaditya Thackeray, Uday Samant latest News)

सामंत म्हणाले, एमओयू करावा अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अग्रवालांना केली होती. मात्र, त्यांनी स्वतःच ट्विट करत खुलासा केला आणि आमचा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर हायपावर कमिटीची बैठक लागत नव्हती. तरी देखील वेदांतापेक्षा चांगला आणि तेवढाच तागदीचा प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्रात आणणार आहे,असे आश्वासनही सामंतांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सिनार्मस नावाच्या कंपनीला ३०० हेक्टर जागेचे वाटप पत्र दिले आहे, आणि आम्ही केलेल्या करारामध्ये २० हजार कोटींचे ऑफर लेटर देखील दिलेले आहे. मात्र, सिनार्मस कंपनीचा एमओयू हा तीन वर्षांपूर्वीच झालेला असून त्याच्यावर एकही टक्का काम झालेले नाही, असे सुरेश म्हणून एमडी आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, गेल्या तीन वर्षांमध्ये आम्हाला काही अडचणींमुळे यावर काम करता आले नाही. आमची अडचण मुख्यमंत्री शिंदे यांना सांगून जे ३ वर्षामध्ये झाले नाही ते ३० दिवसामध्ये झाले, असे राज्य सरकारचे कौतुक करत त्यांनी महाविकास आघाडीला टोलाही लगावला.

आदित्य ठाकरेंचे नेमके आरोप काय?

आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतांना म्हणाले की, हे सरकार अल्पआयूचे आहे.वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या नोट मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचा कुठेही उल्लेख नाही.उद्योगमंत्र्यांचा उद्योगखात्याशी संबंध नाही, आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर एमओयू झालेला नाही, असे थेट आरोप त्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT