Maharashtra Politcs : ना रस्ते, ना दवाखाने; सोलापुरातील गावकऱ्यांनीच सांगितलं कर्नाटकात जाण्याचं कारण

जत आणि सोलापूरच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ गावांनंतर आता आणखी १० गावांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली आहे.
Citizens of Solapur District
Citizens of Solapur DistrictSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Karnatak Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. त्यातच सीमावादाचा हा मुद्दा ताजा असतानाच काल सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील १८ गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दाखवली होती. सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांनी यापूर्वीच असा ठराव केला हेाता. जत आणि सोलापूरच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ गावांनंतर आता आणखी १० गावांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगाव, मुंडेवाडी, कुमठे, केगाव बुद्रूक, केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ आदी गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची मागणी करणाऱ्यांत समावेश आहे.

Citizens of Solapur District
Ajit Pawar : राजकारण पेटलं ; 'मविआ' तुलना औरंगजेबाशी ; अजितदादा संतापले, म्हणाले..

कर्नाटकात जाण्याचे कारणही या गावकऱ्यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गावात रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी आमच्या गावांकडे दुर्लक्ष केलं.

2019 च्या निवडणुकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घालूनही कोणत्याही दखल राज्यकर्त्यांनी याची घेतली नाही. जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखल घेणार नसतील तर आम्ही महाराष्ट्रात का राहायचं? असा सवाल या गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

2019 च्या निवडणुकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घालूनही कोणत्याही दखल राज्यकर्त्यांनी याची घेतली नाही. जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखल घेणार नसतील तर आम्ही महाराष्ट्रात का राहायचं? असा सवाल या गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com