Sameer Wankhede,Prabhakar Sail,Kiran Gosavi sarkarnama
मुंबई

वीस जणांचे जबाब घेऊनही पोलिसांकडे वानखेडेंविरोधात एकही नाही पुरावा!

नवाब मलिक यांच्यासह प्रभाकर साईलने या प्रकरणात खंडणी वसुलीचा आरोप केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी (Aryan khan drugs case) प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosawi) याला काही दिवसांपूर्वीच अटकही करण्यात आली आहे. लाच प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) विशेष तपास पथकही (SIT) नेमण्यात आले आहे. पण या प्रकरणात अजूनही काही पुरावे लागत सापडत नसल्याने तपास थांबवावा लागण्याची नामुष्की या पथकावर ओढवली आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) ताब्यात घेतल्यानंतर त्या रात्री साक्षीदार किरण गोसावी व अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांच्यात तडजोड झाल्याचा गौप्यस्फोट दुसरा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. याच कथित खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष चौकशी पथक) नेमण्यात आली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात सुमारे 20 जणांचे जबाब घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तपासात एकही पुरावा मिळत नसल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाकर साईल याच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली आणि लाच या दोन प्रकरणामध्ये ददलानीचा जबाब अत्यंत महत्वाचा आहे. पण तिचं समोर येत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र तिने प्रकृतीचे कारण सांगून उपस्थित न राहता वेळ मागून घेतली. त्यामुळेच पोलिसांना अद्यापही तिचा जबाब नोंदवता आला नाही.

परिणामी पूजा ददलानी पोलिसांना जबाब येत नाही, तोपर्यंत या प्रकरणी एफआयआर नोंदवता येणार नाही. एकूणच या प्रकरणात अद्याप पुजा समोर न आल्याने किंवा स्वतः शाहरुख खान देखील समोर येवून काहीच न बोललल्याने कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. एसआयटीने सध्या तपास थांबवला असून कायदेशीर सल्ला घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT