CBI Raid On Anil Ramod  Sarkarnama
मुंबई

IAS Anil Ramod news: लाचखोर अनिल रामोडबाबत तपासात धक्कादायक माहिती उघड; नातेवाईकांच्या खात्यात लाखोंची रक्कम अन्...

Pune : भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात रामोड टक्केवारी मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती .

सरकारनामा ब्यूरो

पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड यांच्याबद्दल दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनिल रामोड आणि त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात ४७ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीबीआय ) तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा अहवाल, सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक आय . बी . पेंढारी यांनी न्यायालयात सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासात रामोड यांच्या कार्यालयीन दालनातून एक लाख २६ हजारांची रोख रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच, रामोड यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांच्या १७ बँक खात्यांत ४७ लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. रामोड यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्यांना २७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर रामोड यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Anil Ramod News)

दरम्यान, रामोड यांना जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांचे वकील अॅड. सुधीर शहा आणि अॅड . सचिन पाटील केली होती. पण त्यांना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, शासकीय कर्मचारी किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, त्यांच्या कार्यालया आणि इतर ठिकाणांहून पुरावे गोळा करायचे आहेत. त्यांनी कुठे बेकायदा मालमत्ता खरेदी केल्या आहेत का, याचाही तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे , अशी विनंती सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयास केली . (CBI -Anil Ramod)

याचसोबतच, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड यांची सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्याच्या प्रकरणात लवाद म्हणून नियुक्ती केली होती . सोलापूर , सातारा , पुणे जिल्ह्यातील प्रकरणाकडे रामोड यांच्याकडे आहेत. भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात रामोड टक्केवारी मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती . या प्रकरणी लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने गेल्या आठवड्यात रामोड यांना रंगेहाथ पकडले. भूसंपादनाच्या अनेक प्रकरणांत रामोड यांनी शेतकऱ्यांकडून टक्केवारी घेतल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT