Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Shinde Government : '' हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय..?''

Shinde Government : पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय?

सरकारनामा ब्यूरो

Jitendra Awhad : राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाह समन्वयासाठी समिती नियुक्त करण्यासंबंधी मोठी घोषणा केली आहे. मात्र, आता शिंदे सरकारच्या या निर्णयाला काही महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे असून राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. सरकारच्या याच निर्णयावरून माजी मंत्री व राष्टवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय अशा शब्दात टोला लगावला आहे.

श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येनंतर राज्य सरकारने आक्रमक पावले उचलली आहे. याच दरम्यान सरकारकडून लव्ह जिहाद कायद्यासाठी देखील जोरदार हालचाली सुरु केल्या असून आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची स्थापन करण्याची घोषणा महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे. याचवरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आव्हाड म्हणाले, "आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं असं म्हणत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय असा टोलाही लगावला आहे. आव्हाड यांनी सदरच्या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवरती अतिक्रमण करणारे आहे. असं म्हटलं आहे.

तसेच सरकारकडून जाती व्यवस्था म्हणजेच चतुरवर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू आहे. सदरच्या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवरती अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की, आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय" अशी खोचक टीका ट्विटद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT