Election : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार? भाजप नेत्याचं मोठं विधान

Election : भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे...
loksabha, vidhansabha election
loksabha, vidhansabha election sarkarnama
Published on: 
Updated on: 

सातारा : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत संशय व्यक्त करत अनेकवेळा मध्यावधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या नेते करत असतात. त्याचप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत मोर्चेबांधणीला देखील सुरुवात केलेली आहे. मात्र, याचदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकांविषयी मोठं विधान केलं आहे.

भाजप पक्ष हा काय लुंगा-सुंगा नाही. या पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६-१८ तास काम करतात. आता तर आपलं सरकार असल्याने जबाबदारी कित्येक पटीने वाढली आहे. आगामी विधानसभा, लोकसभा एकत्र होण्याचे संकेत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले पाहिजे, अशा कानपिचक्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

loksabha, vidhansabha election
Gram Panchayat Election : परिचारक समर्थक नेत्याची मंगळवेढ्यात प्रतिष्ठा पणाला

सातारा येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात महिला पदाधिकारी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सुवर्णा पाटील, सुनीशा शहा, सुरभी भोसले, अर्चना देशमुख, गीता लोखंडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या, भाजप पक्ष हा सर्वात मोठा आहे. तो आणखी वाढवायचा आहे. या पक्षवाढीसाठी आता संख्येने नव्हे तर नेतृत्वाने पुढे आले पाहिजे. आज मला आपल्याकडून कोणतेही हार-तुरे नकोत. आपण सर्व पदाधिकारी यांनी प्रभावी काम करुन दाखवा हाच माझ्यासाठी सन्मान असेल. कारण, लवकरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रच होण्याचे संकेत मिळत आहे, त्यामुळे या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकतीनिशी तयार राहिले पाहिजे. तयार रहा,' असा सल्ला यावेळी दिला.

loksabha, vidhansabha election
अजितदादांच्या तालमीत तयार झालेला नेता फडणवीस उतरवणार अशोक पवारांच्या विरोधात?

केंद्र अन राज्यात आपले भाजपचे सरकार आहे, त्यामुळे आपले सरकार चूकीच्या व्यवस्थेला कधीही पाठिशी घालत नाही. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहे. जिल्ह्यात कोठे चुकीचे काय झाले तर कोणाच्या फोनची वाट पाहू नका. तेथे त्वरित जाऊन पोहोचा. त्या कुटुंबाची भेट घ्या. पोलिस ठाण्यात जाऊन कलमे कोणती लावलीत त्याचीही माहिती घ्या. कारण महिलेवर अत्याचार झाला तर तो तिच्या शरीरावर होत नाही. संपूर्ण आयुष्यावर होतो. महिलांना भावनिक आधार देत तिची मैत्रीणही बना.

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात कोणताही शॉर्टकट नाही. तो शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण हे नेहमी बघूनच शिकायचे असते. म्हणून 'राजकारणाकडे प्रोफेशनल म्हणून पहा. पक्षाच्या बैठका घ्या, लोकांच्या विविध समस्यांचे विषय जाणून घेऊन ते तत्काळ सोडवा. भाजप पक्षात आपण पद घेतले आहे,त्याला काम करुन सर्वांनी न्याय द्यावा, असे चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.