Devendra Bhuyar
Devendra Bhuyar Sarkarnama
मुंबई

नाहीतर मला कुठं फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये राहायला मिळालं असतं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्याच्या विधान परिषदेतील सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील रिक्त जागांची निवडणूक नुकतीच झाली. यात शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर महाविकास आघाडीने दोन अपक्ष आमदारांवर फोडले होते. त्यातील एक होते देवेंद्र भुयार. त्यांनी आज विधान परिषदेसाठीचे मतदान झाल्यावर आपली बाजू प्रसार मध्यमांसमोर मांडली. ( It is a secret that MLA Bhuyar, who was declared a breakaway in the Rajya Sabha elections, said )

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून आता मतदान सुरु आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली आहे. मागच्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत संशय व्यक्त केलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेत मत महाविकास आघाडीला देवूनही गैरसमज पसरवले गेले असा खुलासा त्यांनी केला आहे.

आज विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पंचताराकिंत हॉटेलमध्ये रहायला मिळालं, हातभर गादीवर झोपायला मिळालं. अन्यथा कोण आम्हाला कोण विचारत होतं. मत देऊनही माझ्याबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. मात्र आता ही सांगतो की, मत महाविकास आघाडीला दिलं आहे," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजेपर्यंतचे एकूण 203 मतदान झाले आहे. काँग्रेसच्या वीस आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेतीन पर्यंत 288 पैकी 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाची परवानगी मिळविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस नकार दिला. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप मोहिते, माणिक कोकाटे, सुधीर मुनगंटिवार, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी सर्वात शेवटी मतदान केले.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्का बजावण्यासाठी रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले. आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी नाराजीचा सूर लावला. आजही त्यांनी तोच सूर लावत महाविकास आघाडीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT