भुयार पवारांना भेटले अन् काही तासात राऊत बदलले!

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली
Devendra Bhuyar, Sanjay Raut, Sharad Pawar
Devendra Bhuyar, Sanjay Raut, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयारांनी (Devendra Bhuyar) महाविकास आघाडीला साथ दिली नसल्याचे शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राउतांनी (Sanjay Raut) शनिवारी जाहीर केले होते. त्यानंतरच्या घडामोडींना वेग आला आणि २४ तासनंतरच राउतांना भुयार चांगले वाटू लागले. दरम्यान, राउतांच्या आरोपांनतर संतापलेल्या भुयारांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शदर पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, आणि राउतांना भुयारांबाबत साक्षात्कार झाला.

चांगला कार्यकर्ता असल्याचे सांगत राउतांनी अप्रत्यक्षपणे भुयारांनी मतदान केल्याचे सूचित केल्याचे मानले जात आहे. तसे असेल, तर या निवडणुकीतील सहावा दगाबाज आमदार कोण असा प्रश्न शिवसेनेपुढेच उभा राहिला आहे. या निवडणुकीत जे काही घडले ते एकदाच राउतांनी जाहीर करावे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Devendra Bhuyar, Sanjay Raut, Sharad Pawar
Beed : मेटेंच्या पीचवरुन दरेकरांकडून मुंडेंना चिमटे; सत्ता केंद्र फडणवीसांकडे आल्याची स्तुती..

दरम्यान, राउतांनी आरोप ठेवलेले अपक्ष आमदार शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी घेतील आणि त्यानंतर साक्षात्कार होऊन राऊत, अपक्षांवरील आपले आरोप मागे घेतील, असा खोचक टोला भाजपच्या नेत्यांनी लगावला आहे.

देवेंद्र भुयार यांनी शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांचे माझ्याबद्दल जे गैरसमज होते. ते दूर झाले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील सुप्त चर्चेमुळे तो गैरसमज झाला होता. त्या दिवशी मी मतदान केले नाही, अशी चर्चा काही पत्रकार आणि नेत्यांची सुरु होती. त्यामुळे राउतांचा गैरसमज झाला. त्या दिवशी तीन-तीन आमदारांनी मतदानाला जायचे असे ठरले होते. पण तुम्ही गडबड केली. तुम्ही लवकर गेलात. तुम्ही थांबायला हवे होते. असे राऊतांनी विचारले. मी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळेच मतदान करायला गेलो होतो, असे राउतांना सांगितले.

Devendra Bhuyar, Sanjay Raut, Sharad Pawar
विधान परिषद अभी बाकी है...त्यानंतर बरंच काही होईल; महाडिकांचा कुणाला इशारा?

ज्या आमदारांनी मतदान केले नाही, त्यांची राऊत स्वत: चौकशी करत आहेत. माझ्याबाबत त्यांचे शरद पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रतोदांनीही खुलासा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता संपले आहे. या प्रकरणाचा तपास केला जावा, यातील कोण फुटले याची माहिती पुढे आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com