Rohit Pawar, mohit kamboj) sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : कंबोज यांनी 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला ; पवारांचा जोरदार पलटवार

Rohit Pawar : मोहित कंबोज यांच्या टि्वटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता.

सरकारनामा ब्युरो

बुलडाणा : काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं टि्वट करून भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी खळबळ उडवून दिली होती. कंबोज यांच्या टि्वटवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निशाणा साधला आहे. मोहित कंबोज यांनीच 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी टि्वट करून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. यावर बोलत असताना रोहित पवार यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे.

आमदार रोहित पवार शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मोहित कंबोज यांच्या टि्वटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकांवरील निकाल पुढे ढकलून चालणार नाही. लोकशाहीला आणि संविधानाला धरून निर्णय असला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली

सोलापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे, पण, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये सुरुवातीपासून होते, त्यांना काहीही मिळालं नाही मात्र उशिरा गेलेल्यांना मंत्रिपदं मिळाली. जास्त भरती केल्याने लोक गुदमरत आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

दिल्लीचे आम आदमी पार्टीच्या मनीष सिसोदिया यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा रोहित पवार यांनी निषेध केला. त्यांना उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT