मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ; शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस..

Yogi Adityanath : फेसबुकवर पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी योगी आदित्यनाथ यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Yogi Adityanth News, UP Political News Updates
Yogi Adityanth News, UP Political News Updatessarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवर (Facebook) मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी योगी आदित्यनाथ यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (CM Yogi Death Threat news update)

शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याआधीही योगी आदित्यनाथ यांनी धमकी देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत ही 11वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आत्मप्रकाश पंडित नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, खाते हॅक करून कोणीतरी हे काम केल्याचे आत्मप्रकाश पंडित यांनी सांगितल्याचे समजते. शिवाय, ज्या पेजवरून मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे, त्या पेजवर पाकिस्तानचा झेंडा आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोटो आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Yogi Adityanth News, UP Political News Updates
Nilesh Rane : रत्नागिरीत राडा : माफी मागून राणेंनी केली कशीबशी आपली सुटका

या फेसबूक पोस्टबाबत एका ट्विटर युजरने ही बाब उत्तर प्रदेश पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलिसांचा सायबर सेल तपासासाठी सक्रिय झाला आहे. यापूर्वी योगींना धमकी दिल्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक पेज तयार करण्यात आले असून, त्यावरून अशा पोस्ट करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एका पिशवीत धमकी पत्र सापडले होते. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com