Chagan Bhujbal on Sharad Pawar : SARKARNAMA
मुंबई

Chagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केलं; भूजबळांचा गौप्यस्फोट

Chagan Bhujabal News मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भूजबळ यांनी खुलासे केले आहेत

सरकारनामा ब्यूरो

Chagan Bhujbal Criticized Sharad Pawar : २०१४ मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील होईल, असं पवार साहेबांनी सांगितलं होतं. शरद पवार साहेबांनीच सेनेला भाजपपासून दूर केलं, आम्हीही काँग्रेसपासून दूर झालो, सर्व पक्ष वेगवेगळे लढले. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. पण अचानक आमचा पाठिंबा कायम धरु नका, असं भाजपला सांगण्यात आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना सत्तेत सामील करुन घेतलं. , असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहिल्यापासून या सर्व चर्चा प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, पवार साहेब हीच मंडळी करत होती. २०१७ मध्येही असंच झालं, तेव्हा तर मी जेल मध्ये होतो, मला नंतर कळालं. २०१७ मध्येही सेनेला दूर करा आम्ही सत्तेत सामील होतो पण भाजपने सांगितलं की २५ वर्षे मित्रपक्ष असलेल्या पक्षाला आम्ही सोडू शकत नाही, तुम्हीही या आपण तिघेही सत्तेत राहू, तिथेही शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला.

2019 लाही तसंच झालं. शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि निवडणुकीनंर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करायचा प्रस्ताव दिला. पण अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपचं भांडण झालं आणि शिवसेनेनेच आपण भाजपला सोडत असल्याचं सांगितलं. परत भाजपने शिवसेनेला सोडलं. याबाबत ज्या चर्चा झाल्या त्या कुठल्याच चर्चेत मी नव्हतो.

अलीकडे ज्या चर्चा झाल्या त्या सर्व चर्चांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हेच होते. मी नव्हतो. तुम्ही हे सर्व केलं, तर मला दोष देऊन काय उपयोग आहे. या सर्वात ५४ आमदारांच्या सह्या होत्या. यात जयंत पाटील, रोहित पवार, यांच्याही सह्या होत्या. पण आमदांरांनी मी ज्येष्ठ आहे म्हणून मला बोलायला सांगितलं. साहेबांच्या घरातच, साहेब, अजित दादा आणि सुप्रिया ताई यांचं ठरलं. साहेब म्हणाले, मी राजीनामा देणार तुम्ही काय करायचं ते करा.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT