Jitendra Awhad : ‘शरद पवारांना बाप म्हणता, अन् बापावरच घाव घालता’

जितेंद्र आव्हाड यांनी येवला येथील सभेत छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik News : छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी काय द्यायचे राहिले होते. भुजबळ, शरद पवार यांना एकीकडे बाप म्हणता अन् त्या बापावरच वार करतात, ही कुठली संस्कृती आहे, असा प्रश्न माजी मंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी केले.(Chhagan Bhujbal call Sharad Pawar Father, and attack him)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यात येवला येथे जाहीर सभा झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यावर टिकास्त्र सोडले.

Jitendra Awhad
NCP Split News : राजकारणाचा चिखल झाला; परंतु चिखलात बिया उगवतात!

यावेळी श्री. आव्हाड म्हणाले, येवल्याचे माजी आमदार मारोतराव पवारांनी सतत शरद पवार यांची सातत्याने सोबत केली असून, अशी प्रामाणिक माणसे थोडीच आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १४ आमदार देणारा जिल्हा असा नाशिकचा इतिहास आहे.

शरद पवार यांनी २००४ मध्ये ज्यांना आणले, त्यांनी साहेबांना सोडले. छगन भुजबळ तुम्ही साहेबांचे वय मोजता, पण तुम्हीही ७५ वर्ष वयाचे आहात हेही ध्यानात घ्या, असे आमदार आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad
Thackeray-Shinde Politics : सावधान गद्दारांनो ..! दिग्रसमध्ये लावलेल्या बॅनर्समधून गवळी, राठोडांना इशारा

ते पुढे म्हणाले की, भुजबळ बोलतात, की पवारांनी मुंडेचे घर फोडले, मात्र ज्यावेळी स्व. पंडितराव मुंडे तीनदा पक्षात येण्यासाठी आले, त्या वेळी पवार साहेबांनी स्पष्ट नकार देत स्व. गोपीनाथ मुंडेंना फोन करून घर सांभाळा, असा सल्ला दिला होता. पवारसाहेब कोणाच्या घरात डोकावत नाही, असा खुलासा त्यांनी केला.

भुजबळ पवार यांना विठ्ठल, दैवत, बाप म्हणतात. मात्र आता ते म्हणू नका. कारण विठ्ठलावर तलवार चालवणे आणि बापावर घाव घालणे, महाराष्ट्राच्या रक्तात नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

Jitendra Awhad
NCP Split News : राजकारणाचा चिखल झाला; परंतु चिखलात बिया उगवतात!

द्राक्ष, कांद्यावर संकट आले, तेव्हा हाच माणूस तुमच्या पाठीमागे उभा राहिला. पवारसाहेबांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायचे नाही, तर तुम्हाला आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य घडवायचे आहे. कामगार, शोषित, दलित, शेतकरी या सर्वांचा एकच नेता असल्याने कठीणप्रसंगी बापाला आधार द्या आणि बंड करणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com