Raj Thackeray, Jackie Shroff  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : आजोबा म्हणूनही राज ठाकरेंनी ट्रेंड सेट केलाय; जॅकी श्रॉफ यांच्या 'त्या' वक्तव्याचा मनसेकडून...

Avinash Chandane

Mumbai Political News :

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कलाप्रेम आणि कलाकारप्रेम सर्वांनाच ठावूक आहे. तसेच बॉलीवूडचा 'हीरो' जॅकी श्रॉफ ऊर्फ जॅकीदादा यांचा स्वभाव देखील सर्वांच्या परिचयाचा आहे. जॅकी श्रॉफ हे त्यांच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. म्हणूनच एका कार्यक्रमातील जॅकी श्रॉफ यांच्या वक्तव्याला मनसेनं पुन्हा उजाळा दिला आहे. या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ यांनी राज ठाकरे यांचं कौतुक करतानाच त्यांना 'ट्रेंड चेंजर'ची उपमा दिली आहे.

झालं असं की, 22 मे 2022 रोजी डॉ. संजय बोराडे यांच्या 'जनरेशन XL' या पुस्तकाचं प्रकाशन होतं. हे पुस्तक लहान मुलांमधील स्थुलतेवर आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) उपस्थित होते. त्यावेळी जॅकी श्रॉफ यांनी राज ठाकरेंच्या फिटनेसचं कौतुक करताना आजोबा झाल्यानंतरही ते कसे फिट आहेत, हे सांगितलं.

'तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील. पण, राज हा ट्रेंड चेंजर आहे. तो खूप तरुण दिसतो', या शब्दांत जॅकी श्रॉफ यांनी राज ठाकरेंवर कौतुकसुमने उधळली होती. त्याला राज ठाकरे आणि आशा भोसले यांनीही दाद दिली होती.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित (Amit Thackeray) आणि सून मिताली यांना 5 एप्रिल 2022 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि राज ठाकरे आजोबा (Grandfather Raj Thackeray) झाले. आजोबा झाल्यानंतर राज ठाकरेंचे नातवासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दीड महिन्यांनी या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला. त्यामुळे ही संधी साधून जॅकी श्रॉफ यांनी 'सुरकुत्या नसलेला आजोबा' म्हणत राज ठाकरेंच्या फिनटेसचं मनापासून कौतुक केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्पूर्वी जॅकी श्रॉफ यांनी आणखीही एक किस्सा सांगितला होता. 'मला राजनं खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं. महाराष्ट्रात राहतो तर मराठीत बोलता आलं पाहिजे. स्पष्ट बोलता येत नाही मात्र मी प्रयत्न करतो.' हे दोन्ही किस्से जॅकी श्रॉफ यांनी मराठीतून सांगितले होते.

जॅकी श्रॉफ यांचे हे दोन्ही किस्से मनसेच्या श्रीवर्धन शाखेने त्यांच्या फेसबूक पेजवरून व्हायरल केले आहेत. यातून राज ठाकरेंचं मराठीप्रेम आणि आजोबा असूनही कसं फिट राहायचं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT